तेल्हारा – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने तेल्हारा तालुक्यातील जेष्ठ मान्यवर पत्रकारांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये हिवरखेड येथील 94 वर्षीय माजी पत्रकार सहदेवराव भोपळे यांच्या सह सहा ज्येष्ठांना पत्रकार दिनाच्या औचित्य साधून गौरविण्यात आले.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण वृत्तपत्राचे स्मरण म्हणून 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज शुक्रवार दिनांक 6 जानेवारी ला सकाळी 11 वाजता हिवरखेड येथे जावून येथील शतकी वाटचाल करीत असलेले 94 वर्षीय जेष्ठ पत्रकार सहदेवराव भोपळे यांना स्व.भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी त्यांचे चिरंजीव अनिल भोपळे, शामशील भोपळे सौ. भोपळे ताई उपस्थित होते. त्यानंतर बेलखेड येथील जेष्ठ पत्रकार प्रल्हादराव इंगळे यांना स्व. अंगदलालजी चौधरी,पंचगव्हाण यांच्या स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच स्व. तात्यासाहेब शिंगणारे स्मृती गौरव पुरस्कार शेरी येथील वयोवृद्ध जेष्ठ पत्रकार जनार्दन पाटील चतारे यांना देवून गौरविण्यात आले व वाडी अदमपूर येथील जेष्ठ पत्रकार प्रेमसुख भोजने यांना स्व. जेठमलजी जोशी तेल्हारा यांच्या स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यानंतर संध्याकाळी जूने शहर तेल्हारा येथील जेष्ठ पत्रकार, कवी शिवराजे जामोदे यांना तळेगाव बाजार येथील स्व. गुलाबरावजी खारोडे स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शेवटी समारोपीय गौरव स्व. संजयकुमार अहेरकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार प्रा. कृष्णा फंदाट सर यांना देवून गौरविण्यात आले. सर्व ठिकाणी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाने परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर,माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, अकोला जिल्हा अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम करण्यात आले. सर्व कार्यगौरव सोहळ्याला तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, सुरेशराव शिंगणारे, सत्यशील प्र. सावरकर, अनंतराव अहेरकर, रामभाऊ फाटकर, सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, अनिल जोशी, प्रा. विद्याधर खुमकर, प्रशांत विखे, निलेश जवकार, सुरेश सिसोदिया, विलास बेलाडकर, राहूल मिटकरी, अनिल अवताडे, रवि शर्मा, विशाल नांदोकार,अमित काकड सह तालुक्यातील हिवरखेड येथील शामशील भोपळे, गोवर्धन गावंडे, रितेश टिलावत, गणेश सोनटक्के, अभिजीत चतारे, गजानन भोजने इत्यादी उपस्थित होते.