• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्यापासून (दि.१०) दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव’; ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, एकपात्री प्रयोग भरगच्च कार्यक्रम

Our Media by Our Media
December 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 0
0
Granthpradarshan
22
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला,दि.9 :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि. १० आणि रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी,परिसंवाद,व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशीमाहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे.

सविस्तर कार्यक्रम पत्रिका या प्रमाणे- या ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि. १० रोजी सकाळी १२ वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास….जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ, खासदार ॲड. संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड गजानन पुंडकर, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. आशिष राऊत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, डॉ. संजय तिडके व ग्रंथमित्र एस. आर.बाहेती आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वा. ‘संगणकीय युगात ग्रंथाचे स्थान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून ज्येष्ठ साहित्यिक मधुभाऊ जाधव, ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. स्वाती दामोदरे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा थोरात आणि विदर्भ साहित्य संघाच्या (अकोला) सचिव सीमा रोठे यांचा सहभाग असणार आहे तर चंद्रकांत चांगदे परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. याच दिवशी सायंकाळी नितीन शेगोकार यांच्या ‘छु लो आसमान’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

दुसऱ्या दिवशी रविवार दि. ११ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ वा. ‘ग्रंथाने मला काय दिले’ विषयावर परिसंवाद होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे या परिसंवादाच्या अध्यस्थानी असतील तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र यांचा सहभाग असेल राम मुळे या परिसंवादाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतील. त्यानंतर दुपारी दोन वा. ‘अडम धडम’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख हे राहतील तर धीरज चावरे, प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे हे सहभागी होतील.त्यानंतर अकोट येथील हर्षदा इंदाने ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे राहणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांना अकोल्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे. ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: ४६९ उमेदवारांचा सहभाग;१७८जणांची प्राथमिक निवड

Next Post

शनिवारी (दि.१०) शालेय पक्षीमित्र संमेलन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
लोगो पक्षी मित्र

शनिवारी (दि.१०) शालेय पक्षीमित्र संमेलन

बालकांना हृदयशस्त्रक्रियेकरीत

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम: २८ बालकांना हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता; पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.