पातूर ( सुनिल गाडगे)- पातूर शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत सदस्यांनी खातेनिहाय चौकशीबद्दल १५ व्या वित्त आयोगातील खर्चाबद्दल गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे .
सदर तक्रारीमध्ये २०१५ ते २०२२ , १४ वा वित्त आयोग १५ वा वित्त आयोग तथा दलित वस्ती , सामान्य फंड , एमआरजीएस , आरोग्य सुविधा , पथदिवे इत्यादी कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सदर तक्रारीमध्ये नमूद केले आहे. २०२१-२२ या वर्षात ग्रामपंचायतीची एकही ग्रामसभा झाली नसल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे. नमूद कामांची व खर्च केलेल्या रकमेची खातेनिहाय चौकशी केल्यास लाखो रुपयांचे घबाड बाहेर निघेल, असे सदस्यांचे मत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत काही भागामध्ये वीज नसताना सुद्धा तेथील कामावर देयके काढण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाचे गटविकास अधिकारी यांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, ही ग्रामपंचायत सदस्यांची मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रेणुका गजानन गाडगे, प्रेमा अनंता बगाडे, निर्भय पोहरे आदी सदस्य आणि अनंता बगाडे, मंगेश गाडगे, पवन तायडे आदी उपस्थित होते.