अकोला,दि. 8 व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थीचा अभियांत्रिकी गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तंत्रकृतीची निवड तज्ज्ञ परीक्षकाद्वारे विभागीय स्तरावर करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचे शिल्प निर्देशक अरविंद पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कचऱ्यातून विद्युत निर्मिती तथा प्रदूषण नियंत्रण’ या तंत्रकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. या मध्ये सायली पेढेकर, किरण निलखन, निकिता नवलकार, रुचिका तायडे, मयुरी अनभोरे या प्रशिक्षणार्थींनी सहभागी होत्या. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायामध्ये निवेदिता माणिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व्यवसायाच्या मुलींनी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अभियांत्रिकी गटात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापुर यांनी द्वितीय तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी तृतीय क्रमांक मिळविला.जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थी चमुचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक कारण्यात आले.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एस. पी. झोडपे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे(मुलींची) प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीटाकळीचे प्राचार्य ए. एस. सोळंके उपस्थित होते. जिल्हा तंत्र प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता निदेशक चंद्रशेखर शेळके, महेश गुप्ता, व्ही .बी. काळे, शंतनु वानखडे, संदीप पिसे, योगेश्वर घुगे, किशोर परळीकर, संजय अंबुलकर, तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अधिकरी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.