• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान दिव्यांगांच्या सर्वेक्षण कार्याची दखल ; राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

Our Media by Our Media
December 5, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
105 1
0
राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार
16
SHARES
755
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 3 :- जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-2021’ने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दिल्लीतील विज्ञान भवनात आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना’निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्रीमती प्रतिमा भौमिक उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हा आदींना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांगांच्या सशक्तीकरणाकरिता शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत अकोला जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.

अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांगव्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे.

सांघिक भावनेने केलेल्या कार्यातूनच अकोला जिल्हा परिषदेने दिव्यांगांचे सर्वेक्षण कार्य पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगिता अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण कार्य पार पडले. या कार्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सातत्यपूर्व मार्गदर्शन आणि सहकार्य केले. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता व त्यांची टीम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदिंचा यात सहभाग लाभला.

या कार्यक्रमात एकूण १४ श्रेणीत विविध व्यक्ती तसेच शासकीय व अशासकीय संस्थांना वर्ष २०२१ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यामध्ये अकोला जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

Top Bollywood Celebrities With Expensive Cars

Previous Post

मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिना निमित्ताने ग्रामीण रूग्णालय तेल्हारा मध्ये पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Next Post

समता पर्व; मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रश्न मंजुषा, गीत गायन स्पर्धा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
समता पर्व; मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रश्न मंजुषा, गीत गायन स्पर्धा

समता पर्व; मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रश्न मंजुषा, गीत गायन स्पर्धा

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा भाजप कार्यकर्त्यांना 'फ्लाईंग किस', कार्यालयाच्‍या टेरेसवरुन पाहत होते भारत जोडो यात्रा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.