• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रा.पं. निवडणूक; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा

Our Media by Our Media
November 15, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
109 1
0
Election
17
SHARES
783
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१५ :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त अर्ज जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. तथापि, उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासह वैधता प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा पुरावा व निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमी पत्र सोबत  द्यावयाचे आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालाधीत मुदत संपणाऱ्या तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात आढळत नसलेल्या  सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानुसार नामनिर्देशन दाखल करताना उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्रासह  वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा पुरावा द्यावयाचा आहे. यासोबतच निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्याआत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमी पत्र देण्याची मुभाही देण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांस जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करणे सोईचे होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसिलदारांना आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तहसिलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून  जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवासांपर्यंत स्विकारून प्राप्त झालेला अर्ज सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावा, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन

Next Post

प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती ; लम्पिपासून बचावासाठी जनावरांना द्या योग्य शुश्रूषा व पौष्टिक आहार-पशुवैद्यकांचा सल्ला गुरांना मोकाट सोडू नका- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्राणि क्लेष प्रतिबंधक समिती बैठ

प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती ; लम्पिपासून बचावासाठी जनावरांना द्या योग्य शुश्रूषा व पौष्टिक आहार-पशुवैद्यकांचा सल्ला गुरांना मोकाट सोडू नका- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

google

Tech World : गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते कर्मचारी कपात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.