आगिखेड (सुनिल गाडगे) :- दिनांक :- ३/११/२०२२ रोजी सकाळी ९.३० वा. ग्रामपंचायत, आगिखेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला अंतर्गत कायदे विषयक जनजागृती कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा मध्ये दिवाणी व फौजदारी मा. न्यायाधीश श्री. कुरंदळे सर, मा. सहन्यायाधीश श्री. ठाकरे सर वरिष्ठ लिपीक श्री. मोहोरे कनिष्ठ लिपीक श्री. घोडे, ॲडो. श्री. वानखडे, श्री. मृर्ग, श्री. तेलगोटे यांनी गावातील नागरिकांना कायदे विषयक माहिती दिली. कार्यक्रमाला मा. न्यायमूर्ती व्दय, कर्मचारी, वकील मंडळी व पोलीस स्टेशन पातूर चे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत चे सचिव श्री. साळुंके, कर्मचारी श्री. किसन जामोदे, संगणक परिचालक श्री. राहुल श्री.उगले, आगिखेड व पार्डी गावातील प्रतिष्ठित नागरिक व बचत गट महिला मंडळ उपस्थित होते.