• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन: सेवेतून विश्वास निर्माण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Media by Our Media
October 8, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
113 1
0
Akola
17
SHARES
816
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.8 :- पोलीस स्टेशन हे जनतेचे कार्यालय असून प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. या इमारतीत प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकले जावे, त्याच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण व्हावे, असा विश्वास आपल्या सेवेतून निर्माण करावा,अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ.रणजीत पाटील, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

श्री.फडणवीस म्हणाले की, पोलीस विभागाचे कार्यालय हे जनतेचे कार्यालय आहे. प्रत्येक सामान्य नागरिकांना न्याय मिळेल अशी व्यवस्था तेथे निर्माण करावी. याकरीता पारदर्शकता, प्रकरणांचा तातडीने निपटारा व नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करावा. आपण जनतेचे सेवक असून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बाधीत करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर संपुर्ण इमारतीची पाहणी केली.

नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयः- या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 4289.87 चौ.मिटरचे असून इमारतीमध्ये पोलीस अधीक्षक कक्षासह, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता सुसज्ज कक्षांचे निर्माण करण्यात आले आहे. या इमारतीच्या बांधकामास 10 कोटी 80 लक्ष 85 हजार 151 रुपये खर्च करण्यात आला आहे.

Tags: AkolaDevendra Fadanvispolice station
Previous Post

जिल्हा नियोजन समिती बैठक: जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यक्रम; क्षेत्रनिहाय पदनिर्देशीत अधिकाऱ्यांची नेमणूक: मतदारांनी संबधित कार्यालयात अर्ज करावे-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यक्रम; क्षेत्रनिहाय पदनिर्देशीत अधिकाऱ्यांची नेमणूक: मतदारांनी संबधित कार्यालयात अर्ज करावे-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कापसी लसीकरण

कापसी येथे कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.