• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दसरा बंपर लाॅटरीचे तिकिट बंफर पिऊन बनविले का? महाराष्ट्र राज्य लाॅटरीच्या कारभारावर संशयी नजर!

Our Media by Our Media
September 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
144 1
0
Akola
24
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (संजय कमल अशोक)- महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दसरा बंपर आॅफरच्या कोट्यावधी तिकिटांवर चक्क विड्याच्या कलकत्ता बांगला पट्टी पानाचे छायाचित्र छापल्याने ग्राहक संभ्रमात पडले असुन विक्रेत्यांना नानाविध प्रश्न विचारत आहेत. या घोड चुकिमुळे महाराष्ट्र राज्य लाॅटरीच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात असुन तिकिट विक्रीवर या वाईट परिणाम होणार असल्याचे दिसुन येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य लॉटरी विविध सणांना विषेश भव्यतम सोडत तिकिटे काढत असते. त्या त्या सणाशी संबंधित चित्र तिकिटांवर प्रकाशित करून राज्यभर तिकीट विक्री करीत असते. जसे की गुढीपाडव्याला गुढीचे छायाचित्र गणपतीमध्ये गणेशाची छायाचित्र प्रकाशित करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत असते. या आकर्षक चित्रांमुळे लॉटरी तिकीट विक्रीमध्ये वृद्धी होऊन राज्य शासनाला तेवढा अधिक महसूल मिळतो.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यंदाच्या दसऱ्याच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या दसरा भव्यतम सोडत अर्थात दसरा बंपर ऑफर या सोडत क्रमांक दोनच्या लॉटरीच्या सर्व तिकीटांवर चक्क खायच्या विड्याच्या पानाकरिता वापरण्यात येणाऱ्या कलकत्ता बांगला पट्टी पानाचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यावधी तिकिटांवर तसेच या तिकिटांच्या विक्रीकरिता होत असलेल्या जाहिरात फलकांवर सुद्धा ह्याच पट्टी पानाचे छायाचित्र प्रकाशित करून राज्यभर प्रसारित करण्यात आले आहे.

दसऱ्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पूजेसाठी सोने म्हणून शमी पानांचा वापर करण्यात येतो तर चांदी म्हणून आपट्याच्या पानांचा वापर करण्यात येतो. या दोन्ही पानांचा वापर सर्वत्र प्रसार माध्यमे करीत असतात पण महाराष्ट्राच्या राजकोषामध्ये आपल्या विक्रीतून भर टाकणार्या दसरा बंपर ऑफर चे तिकीट हे बंफर पिऊन तर बनविले नाही ना? असा सवाल जागृक ग्राहक लाॅटरी विक्रेत्यांना करित आहेत.

तब्बल ५१ लाख रुपयांचे प्रथम सामायिक बक्षीस असताना आणि दहा हजाराची १०० बक्षीसं असुन प्रति तिकिट दर तब्बल २०० रुपये असताना एवढ्या मोठ्या विशेष सोडतीच्या तिकीट निर्मितीत जर ऐवढी ठळक चूक होत असेल तर येणारा लॉटरी निकाल हा अचूक कशावरून असणार असा संशय जागरूक ग्राहक घेत आहेत. येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या तिकिटाच्या सोडतीच्या निकालापूर्वी राज्य शासनाने तिकिटावर प्रकाशित या पानाचा खुलासा करावा आणि ग्राहकांमधील संभ्रम दुर करावा, अशी मागणी चोखंदळ ग्राहकांनी केली आहे.

ग्राहकांच्या प्रश्नाने परेशान होत आहोत!

दसरा बंपर ऑफर तिकिटावर पानाचे छायाचित्र छापले आहे हे छायाचित्र दसऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पानांचे आहे की कशाचे आहे? याबाबत ग्राहक सतत प्रश्न विचारतात आणि तिकीट घेणे नाकारतात त्यामुळे आम्ही विक्रेते परेशान झालो आहोत.

महेंद्र गाडवे, लाॅटरी विक्रेता

आनंद लाॅटरी सेंटर, अकोला.

Previous Post

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याचा जागर; माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

महात्मा फुले समता परिषद तर्फे दिपक सदाफळे यांचा गौरव

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola

महात्मा फुले समता परिषद तर्फे दिपक सदाफळे यांचा गौरव

Udhhav Thackeray And Eknath Shinde

Shiv Sena Dasara Melava: ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.