तेल्हारा :- स्थानिक शाह हाजी कासम र अ बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था तेल्हारा व सुलतान ग्रुप तेल्हारा च्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी तेल्हारा येथे संपन्नता झाला. इयत्ता 10,12, नीट परीक्षा, वैद्यकीय शिक्षण मध्ये मुस्लिम समाजातील सर्व गुणवंताचा यावेळी रोख बक्षीस, सन्मान पत्र, आणि ट्रॉफी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणी शाह सर, प्रामुख्याने हाजी अन्वर शाह बाबू,हाजी सुलतान शाह पहेलवान, इसहाक सर,संस्थेचे सचिव अफसर शाह अन्वर शाह, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक वाहिद खान सर, रुबिना निसार अली खान, डॉ मोसीन कुरेशी, डॉ शहजाद खान, डॉ समीर शाह, मोबिन शाह भारतीय सैनिक, यासिन कुरेशी, इर्शाद शाह, शाहीन शाह, रजाक शाह सुलतान ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सलीम शाह पहेलवान उपस्थित होते.
यावेळी विशेषतः नीट परीक्षा 2022 मध्ये शाह समाजातील भारतीय सीमेवर कर्तव्य पार पाडत असलेले अकोट येथील मोबिन शाह यांचे चिरंजीव सोहिल शाह यांनी 664 मार्क्स प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सोहिल शाह यांचा सन्मान करण्यात आला त्याच प्रमाणे वैद्यकीय शिक्षण मध्ये अमरावती कॉलेज मधून प्रथम आलेला वाजीद खान युनूस खान, व मुजफ्फर शाह अझहर शाह यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे तेल्हारा, घोडेगाव, पंचगव्हान येथील शाळे मधील 10,12 मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या सर्व गुणवंताना रोख बक्षीस, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ मोहसीन, डॉ शहजाद,अफसर शाह,वाहिद खान सर, इसहाक सर, गणी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझहर शाह सर, आभार प्रदर्शन जब्बार सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करिता जाबिर भाई जावई, गोलू मंत्री, रहेमान शहा, रिजवान शाह, गुलजमा सर,मुजमिल सर, मुख्तार शाह, बाबा नूर, अन्सार गुरू, अनिस शहा, मूनवर शाह, यांनी प्रयत्न केले.