अकोला,दि. 14 : नेहरू युवा केंद्राद्वारे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय युवा उत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र युवक युवतीनी संबधित तालुक्यातील स्वयंसेवकाकडे मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत यांनी केले.
स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृदिंगत करणे आणि तरुण युवा कलावंताना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा तसेच ग्रुप सांस्कृतिक व जिल्हा युवा संमेलन-भारत @2047 युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची थीम ‘भारत @2047’ ठरविण्यात आली आहे. स्पर्धेंकरीता स्पर्धक हा अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याचे वय 15 ते 29 च्या दरम्यान असावे. स्पर्धकाला कुठल्याही एका स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. या स्पर्धेची प्राथमिक निवड तालुका स्तरावर करण्यात येईल. चित्रकला, मोबाईल फोटोग्राफी व कविता स्पर्धे प्रत्येक तालुक्या मधून प्रथम चार विजेता, भाषण स्पर्धेमधून प्रथम दोन, जिल्हा युवा संमेलनासाठी प्रत्येक तालुक्यातून एक व जिल्हा सांस्कृतिक महोत्सवातून प्रत्येक तालुक्यातील एक ग्रुप जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतील. जिल्हास्तरीय विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. तर जिल्हास्तरावरील प्रथम दोन विजेतांना राज्य स्तरीय स्पर्धेत भाग घेतील.
ईछुकांनी तालुका स्तरीय स्वयंसेवकांशी संपर्क साधून स्पर्धेविषयी विस्तृत माहिती घेऊन https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid04yfaXWqskUBSW6YTSzZ6csaSponnH7sTKnkT7726BHU7jaawTJciEd75UcKpzbZml&id=100011996795817&sfnsn=wiwspwa या लिंक वर अर्जाचा नमूना देण्यात आला आहे. अर्ज परिपूर्ण भरून आयडी प्रूफसह संबधित तालुक्यातील स्वयंसेवकाशी संपर्क साधावा. तालुका स्तरावरील निवड चाचणीच्या वेळी मूळ अर्ज व आयडी प्रूफची सत्यप्रती आवश्यक राहिल.
तालुकानिहाय स्वयंसेवक याप्रमाणे : अकोट येथील शुभम भालेराव(मो.क्र. 9021395276), अकोला येथील हरिओम राखोंडे (मो.क्र. 7057014736), अकोला येथील अमोल भटकर (मो.क्र. 9607455698), बाळापुर येथील विकास जाधव (मो.क्र. 9545154178), बार्शीटाकली येथील वैशाली गालट (मो.क्र. 7028606874), बार्शीटाकली येथील सागर चौधरी (मो.क्र. 7083432174), मुर्तीजापूर येथील नारायण ठाकरे (मो.क्र. 9822521860), पातुर येथील पल्लवी मांडवगणे (मो.क्र. 7066223301), पातुर येथील अमोल भटकर (मो.क्र. 8552868580), तेल्हारा येथील प्रदीप राऊत (मो.क्र. 9767323476) व तेल्हारा येथील विकी वाघ (मो.क्र. 9527037901).