अकोला दि.14 : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम दि.13 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज(दि.13) कस्तुरबा गांधी रुग्णालय, अकोला येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून केला.
उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी निर्देश दिले की, आशा स्वयंसेविक, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी घरोघरी भेटी देऊन क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांचा शोध घ्यावा. कुष्ठरुग्ण महिलांची आवर्जून तपासणी करावी. मोहिम यशस्वीतेसाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करावे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोलें यांनी शासनाच्या धोरणानुसार 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याच्या दृष्टीने जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना दिल्या. मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपाचे प्रशासन उपायुक्त श्रीमती वंजारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, मेडिकल ऑफिसर कुष्ठरोग डॉ. संदीप बाबर, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. उपाध्ये आदि उपस्थित होते. तर जिल्हा क्षयरोग कार्यालय येथील वसंत उन्हाळे, शहर शहरोग उमेश पदमने बाबेरवाल, प्रतीक गाडगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.