MDL Recruitment 2022 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) मध्ये कुशल ( Skilled) आणि निम्न-कुशलची (Semi-Skilled) हजारहून अधिक रिक्त पदे आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी mazagondock.in वर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्जाची लिंक आज १२ सप्टेंबर २०२२ पासून उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. (Mazagon Dock Recruitment 2022)
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण १,०४१ पदे रिक्त असून त्यासाठी भरती होणार आहे. यात मॅकेनिक, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, इलेक्ट्रिशियन, फिटर, पाइप फिटर, ऑपरेटर आणि अन्य पदांचा समावेश आहे. उमेदवार या भरती संदर्भात अधिक माहिती खाली दिलेल्या पीडीएफ लिंकवर पाहू शकतात .
किती मिळेल पगार?
स्पेशल ग्रेड (IDA-IX) – २२,०००-८३,१८० रुपये
स्पेशल ग्रेड (IDA-VIII) – २१,०००- ७९,३८० रुपये
स्किल्ड ग्रेड-II(IDA-VI) – १८,०००-६८,१२० रुपये
स्किल्ड ग्रेड-I (IDA-V) – १७,०००- ६४,३६० रुपये
सेमी- स्किल्ड ग्रेड Gr-III (IDA-IVA) – १६,०००- ६०,५२० रुपये
सेमी- स्किल्ड ग्रेड Gr-I (IDA-II)- १३,२००- ४९,९१० रुपये
Mazagon Dock Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक – रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ट्रेडमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशीप प्रमाणपत्र परीक्षा (National Apprenticeship Certificate Examination) उत्तीर्ण.
ब्रास फिनिशर – कोणत्याही ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशीप सर्टिफिकेट उत्तीर्ण असणे आवश्यक आणि MDL/शिप-बिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून कामाचा अनुभव.
ब्रास फिनिशर – कोणत्याही ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशीप सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण आणि MDL/ जहाज बांधणी उद्योगात ब्रास फिनिशर/ मशिनिस्ट म्हणून कामाचा अनुभव. जहाज बांधणीचा एक वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
कारपेंटर – कारपेंटर/ शिपराईट (लाकूड) ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशीप सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण.
चिपर ग्राइंडर – कोणत्याही ट्रेडमध्ये NAC उत्तीर्ण आणि शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून किमान एक वर्षे काम केलेले असेल तर ते या पदासाठी थेट अर्ज करू शकतात.
वय मर्यादा
कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे आणि १ सप्टेंबर २०२२ रोजी किमान वयोमर्यादा १८ वर्षांपेक्षा कमी नसावी.
परीक्षा गुण
लेखी परीक्षा – ३० गुण
जहाज बांधणी उद्योगातील अनुभव -२० गुण
ट्रेड चाचणी – ५० गुण
Mazagon डॉक भरती २०२२ साठी अर्ज कसा करावा?
MDL वेबसाइट https://mazagondock.in वर लॉग इन करा
Careers >> Online Recruitment >> Non-Executive वर जा
Non- Executive Tab वर क्लिक करा
संबंधित तपशील भरून नोंदणी करा आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा.
ईमेलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.
MDL ऑनलाइन पोर्टलवर Username आणि Password सह लॉग इन करा.
Non-Executive Tab अंतर्गत जॉब निवडा आणि Eligibility Criteria पहा
सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्जातील सर्व तपशील भरा.
अर्ज फॉर्ममधील कोणताही बदल Submit वर क्लिक करण्यापूर्वी संपादित करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही General/ OBC/EWS श्रेणीतील असाल तर तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
Home टॅबवर क्लिक करा आणि तुमचा अर्ज submission status मध्ये यशस्वीपणे सबमिट झाल्याची खात्री करा.
unique registration क्रमांकासह तुमच्या अर्जाची प्रिंट घ्या.