अकोला,दि.7: विप्र युवा वाहिनी, गणेशोत्सव मंडळ, अकोला यांच्यामार्फत सोमवारी (दि.5) गणेशोत्सवात आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात आले. गणेश आरतीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी उपस्थित भाविकांना तंबाखु विरोधी शपथ दिली. तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत भाविकांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आले.
त्यानंतर पीसीपीएनडीटी कार्यक्रमाअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे बॅनर, पोस्टरव्दारे जनजागृती करण्यात आली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सदस्य, लायन ग्रुप सफायरचे सदस्य, अकोला बार असोसिएकशनचे सदस्य, तसेच डॉ. आदित्य महानकर, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. श्रेय अग्रवाल, डॉ. हर्षल चांडक, डॉ. प्रिती कोगदे, ॲड. शुभांगी ठाकरे, धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, नंदन चौरपगार, सय्यद आरीफ, रिना चोंडकर, राधीका जाधव आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.