अकोला,दि.6 :- जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव संदर्भात आज पशुसंवर्धन आयुक्त संचिन्द्र प्रताप सिंह यांनी अकोट तालुक्याला भेट देऊन उपाययोजनाबाबत आढावा घेतला. रोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तांनी संबधिताना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पि स्किन डिसीज संदर्भात आढावा बैठकी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. जगदिश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, सहायक आयुक्त डॉ. तुषार बावणे, डॉ. राठोड आदि उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर पशुसंवर्धन आयुक्त यांनी अकोट तालुकातील लघु पशुवैद्यकीय चिकीत्सालय येथे भेट देऊन तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज आजाराच्या उपायांचा आढावा घेतला. यावेळी अकोट तालुक्यातील 7193 जनावरांना प्रतिबंधक लसीकरण तसेच 274 गोंठे फवारणी केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर शिवपुर(कासोद) व जितापुर रुपागड या गावाला भेट देऊन पशुपालकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले.