• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘लम्पि स्किन डिसीज’ची १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लागण: पशुपालकांमध्ये जनजागृतीवर भर; प्रभावित क्षेत्रात जनावरांचे लसीकरण सुरु

Our Media by Our Media
August 29, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
‘लम्पि स्किन डिसीज’ची १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लागण: पशुपालकांमध्ये जनजागृतीवर भर; प्रभावित क्षेत्रात जनावरांचे लसीकरण सुरु
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२९:  जिल्ह्यात १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून प्रभावित क्षेत्रातील (बाधीत जनावरांच्या ५ किमी परिघातील) जनावरांचे लसीकरण सुरु झाले आहे. प्रभावित क्षेत्रातील जनावरांची संख्या २२ हजार २९१ असून जिल्ह्यात ३५ हजार लसींचा साठी उपलब्ध आहे. पुढील शक्यता लक्षात घेता लसींचा आणखी साठा मागविण्यात आला असून पशुपालकांनी आपल्या जनावरांवर लक्ष ठेवावी जनावरांस संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात मौजे निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. अशा बाधित जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील प्रभावित क्षेत्रात ५७ गावे असून अशा गावांमध्ये २२ हजार २१९ जनावरे आहेत. सद्यस्थितीत प्रभावित क्षेत्रातील या सर्व जनावरांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३५ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत ४ हजार ९३९ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून १४१ जनावरे उपचारानंतर बरेही झाले आहेत, अशी माहितीही पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निपाणा ता. अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन जनावरांची पाहणी केली व पशुपालकांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. जिल्ह्यातील अन्य भागातही पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरु करण्यात आले आहे. गोठे निर्जंतूकीकरण (सोडियम हापोक्लोराईड फवारणी करुन) करण्यात येत असून गोचिड, गोमाशी, चिलटे निर्मूलनाचीही उपाययोजना करण्यात येत आहे.

लम्पि स्किन डिसीज लक्षणेः- लम्पि स्किन डिसीज हा आजार बाह्य किटकाद्वारे पसरतो. संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरुपाचा ताप २ ते ३ दिवस असतो. काही वेळा १०५ ते १०६ फॅ. इतकाही ताप असू शकतो. ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ से.मी. आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात व श्वसन नलिकेत पुरळ येतात. तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते. जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व तात्काळ जनावरास उपचार द्यावे.

पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. हा आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधीत जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड २ टक्के या औषधाची फवारणी करावी. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

Previous Post

NEET-PG Counseling : विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आणू शकत नाही, NEET-PG समुपदेशन प्रक्रियेत हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Next Post

“माझी शेती माझा सातबारा, मीच लिहीणार माझा पीकपेरा” ‘ई-पिक पाहणी’ मोबाईल ॲपव्दारे 7/12 उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक नोंद; जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सांगितले महत्व

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
“माझी शेती माझा सातबारा, मीच लिहीणार माझा पीकपेरा” ‘ई-पिक पाहणी’ मोबाईल ॲपव्दारे 7/12 उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक नोंद; जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सांगितले महत्व

“माझी शेती माझा सातबारा, मीच लिहीणार माझा पीकपेरा” ‘ई-पिक पाहणी’ मोबाईल ॲपव्दारे 7/12 उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक नोंद; जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सांगितले महत्व

अकोला सर्वोपचार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये -आमदार सावरकर यांचा इशारा

अकोला सर्वोपचार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये -आमदार सावरकर यांचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.