पातूर (सुनिल गाडगे)- पवित्र्य श्रावण महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा पातूर तसेच मंगेशदादा गाडगे (बजरंगी) मित्रपरिवार तर्फे भव्य कावड यात्रेच आयॊजन करण्यात आले होते. सर्व कावड यात्रींनी मोरणा धरण येथून जल आणून आपल्या सर्व देविदेवतांचा जलाभिषेक केला. दिवसभर पावसाच्या व्यत्यया नंतर सुद्धा तरुणांचा उत्साह कमी नव्हता होत हे विशेष या कावड यात्रेला समाजिक, राजकीय प्रतिष्टीत नागरिकांनी उपस्थिती दर्शवली,यामध्ये भाजपा अकोला चे मा. आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, मा. आमदार श्री. हरीशभाऊ पिंपळे, श्री. अनुप संजय धोत्रे, श्रीराम सेना जिल्हााध्यक्ष श्री. पप्पू भाऊ मोरवाल, बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक श्री. अमोल भाऊ अंधारे,श्री राजेश भारती, श्री. सचिन भाऊ सोळंके, बाळापूर चे माजी आमदार श्री. बळीराम शिसरकार, काँग्रेस नेते श्री. प्रकाश तायडे,टायगर ग्रुप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्री. आकाश भाऊ शिरसाठ, वंचित नेते श्री. धेर्यवर्धन, श्री गणेशभाऊ सांगळे, श्री. विजयसिंह गहिलोत,श्री जयंत म्हसणे (महापौर), श्री. अंनता बगाडे, शिर्ला ग्रामपंचायत उपसरपंच सौ. कल्पनाताई खरडे, श्रीमती. रेणुकाताई गजानन गाडगे, सौ. प्रेमाताई अनंता बगाडे,श्री किशोरभाऊ काळदाते, राजूभाऊ चव्हाण, योगेश गुळदे आणी इतर मान्यावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला विशेष सहकार्य आणी मार्गदर्शन श्री गोपाळभाऊ हरणे,श्री राकेशसिंह बायस,श्री संतोष सावत, श्री ज्ञानूभाऊ गोमासे,श्री ओमप्रकाश धर्माळ, श्री भोजु भाऊ बायस, श्री राजुभाऊ उगले, श्री राजूभाऊ बोरकर,श्री दिनेश गवई,दिनेश गोतरकर,सागर चव्हाण यांनी केले.
सदर कावडयात्रेचा समारोप सिदाजी महाराजांच्या जलाभिषेकाने झाला. या कावडयात्रे चा कार्यक्रम सर्व शासन नियमावली मध्ये पार पडला, शहरातील नागरिकांनी ठीक ठिकाणी कावडयात्रीन साठी फराळ,जेवणाची सोय केली होती. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. मंगेश गाडगे, निलेश गाडगे, नाना देशमुख, आशिष पवार, कुणाल लाहोळे, प्रफुल कुरई, विठ्ठल पाटील, गोपाल निमकंडे, महेंद्र फलके, अजय पाटील, राहुल उगले, करण गहिलोत, गौरव चव्हाण, पवन तायडे, सुरज क्षीरसागर, अंकित निखाडे, अजय गाडगे, आकाश इंगळे, रवी बगाडे, स्वप्नील परमाळे,सागर इंगळे, हर्षल निखाडे, बाबुलाल श्रीनाथ, दिगंबर फुलारी, आदीत्य इंगळे, जगदीश पुरुषोत्तम, अनिल तायडे, स्वप्नील तायडे, अजय बंड, अक्षय तायडे, आदर्श पेंढारकर, सागर माहुलीकर, महेश बोचरे, गनेश तायडे, इतर मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.