अकोला, दि.2: समाज कल्याण विभागाव्दारे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद उपक्रम राबविल्या जातात. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी थेट विद्यार्थ्यांसोबतच बुधवारी दि.27 जुलै रोजी शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा अभिनव उपक्रम समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मागर्दशनात राबविण्यात आला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून असा प्रयोग राज्यात प्रथमच राबविण्यात आला आहे. पुणे येथील आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथील वसतिगृहात मुक्काम करून स्वत: विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सुविधा, जेवन, विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली. यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली असून त्याबाबत ऑनलाईन बैठकीत निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अकोल्याचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यानी सुद्धा वसतीगृहात मुक्काम करुन विद्यार्थ्यांबरोबर जेवण केले. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद कार्यक्रम संकल्पनेने विद्यार्थी देखील भरावून गेले. विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टींवर मनमोकळया गप्पा अधिकारीबरोबर केल्या. तसेच वसतिगृहाच्या गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतिगृहात निवासी राहण्याच्या सक्त ताकिद दिल्या. विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरवाव्या. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम व विविध तज्ञ व्याख्यान आयोजित करावे, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिल्या.