बाळापुर (पंकज इंगळे)- पिक विमा काढण्याची तारीख ३१ जुलै असून हि तारीख १० ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात यावी अशी मांगणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला (आठवले) बाळापूर तालुका अध्यक्ष पंकज इंगळे व अकोला जिल्हातील सर्व शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री महा रा . मुंबई , विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अकोला, निवासी जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी बाळापुर यांना दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ रोजी ई – मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
तरी संपूर्ण जुलै महिन्यामध्ये अतिदुष्टी ढगफुटी सततचा मुसळधार पाऊस सुरू असल्याचे मुळे प्रधानमंत्री पीक विमाचे सर्व्हर हे डाऊन असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यापासून वंचित राहिले आहेत.
कोणताही शेतकरी हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये म्हणून पीक विमा काढण्याची तारीख 10 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट पर्यत वाढवविण्यात यावी , अशी मांगणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला (आठवले) बाळापूर तालुका अध्यक्ष पंकज इंगळे व सर्व शेतकरी यांनी मुख्यमंत्री महोदय व इतर अधिकारी वर्गाला केली आहे.