• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव; ‘महावितरण’ची कामगिरी कौतुकास्पद: मान्यवरांचा सूर

Our Media by Our Media
July 29, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
109 1
0
‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव; ‘महावितरण’ची कामगिरी कौतुकास्पद: मान्यवरांचा सूर
16
SHARES
784
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.29: देशाने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली असून यामध्ये महावितरणाचा मोठा वाटा आहे. वीज ही विकासाची जननी असून जीवनाचा अविभाज्य घटक आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वीज पोहोचवण्याची महावितरणची कामगिरी कौतुकास्पद आहे, असा सूर विविध मान्यवरांनी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव या कार्यक्रमात लावला, व महावितरण च्या कामगिरीचे कौतुक केले.

जिल्हा नियोजन भवन येथे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य, पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सवाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, नोडल अधिकारी दिपक जैन आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने म्हणाल्या की, विज समस्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात याबाबत त्यांना नाराजीचाही सामाना करावा लागतो. तरी सुद्धा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सयमी स्वभावाने मानवी सेवा करीता असतात. अनेकवेळा त्यांना जीवावर बेतून काम करावी लागतात. त्यांचे कामे कौतुकास्पद आहे. या महोत्सवानिमित्त शासनाच्या योजना व उपक्रमाचा लाभ सामाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार हरिष पिंपळे म्हणाले की, सर्व क्षेत्रामध्ये विजेची मोठी मागणी आहे. विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा मुबलक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागापर्यंत सुरळीत विज पुरवठा होईल याकरीता प्राधान्याने काम करावे, असे आवाहन यावेळी केले.

आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले की, महावितरणाची जिल्ह्यातील कामगिरी उल्लेखनिय असून विशेषत: काही दिवसापुर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. अशावेळी महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन विजपुरवठा सुरळीत चालु केला. सेवा देण्याचे महत्वाचे काम महावितरण कर्मचारी करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे संजय फुंडकर आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर खंडूजी सिरसाट यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या.

देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअशोक पेटकर यांनी तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी दिपक जैन यांनी केले.

Previous Post

मामा भाच्याने लुटले २५ लाख ७५ हजाराचे दागिने, काही तासात मामा भाच्याला अटक

Next Post

मराठा समाजाला पुन्हा मोठा धक्‍का! EWS आरक्षण हायकोर्टाकडून रद्द

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
उच्च न्यायालय : संमतीने शरीर संबंधानंतर लग्‍नास नकार ही फसवणूक नव्हे

मराठा समाजाला पुन्हा मोठा धक्‍का! EWS आरक्षण हायकोर्टाकडून रद्द

nima arora

निंभा येथील ईवर्ग जमीनीवरील अतिक्रम काढले; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.