अकोला,दि.१३: महसूल व वन विभागाच्या निर्देशाप्रमाणे अवैध उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस डिवाईस लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणारे वाहतूकदार, खाणपट्टाधारक व क्रशरधारक यांनी रविवार दि. ३१ जुलैपर्यंत गौण खनिज वाहनांवर जीपीएस डिवाईस लावावे. जीपीएस डिवाईस न लावलेल्या वाहनावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता साफले यांनी कळविले आहे.
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी वाहतुकीच्या सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी ‘महाखनिज’ (mahakhanij) ही संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली आहे. वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ॲटोमोटीव्ह इंडस्ट्री स्टँर्डड १४० आयआरएनएसएस प्रमाणके असलेले जीपीएस डिवाईस लावणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनांचे रियल टाईम मॉनिटरिंगव्दारे अवैध उत्खननास आळा घालणे शक्य होणार आहे. जीपीएस डिवाईस दि.३१ जुलैपर्यंत महाखनिज प्रणालीशी लिंक करणे आवश्यक असून जीपीएस डिवाईज महाखनिज प्रणालीशी लिंक न केल्यास वाहनाकरीता ईटिपी जनरेट होणार नाही व ईटिपी क्रमांकाशिवाय केलेली वाहतुक अवैध समजण्यात येईल. अशा वाहनांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व खनिजपट्टाधारक, परवानाधारक, यशस्वी लिलावधारक व गौणखनिज वाहतुकदार यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता साफले यांनी कळविले आहे.