अकोला, दि.12: महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची व सर्व पंचायत समितीमधील उपसभापती पदाची निवडीकरीता आयोजित केलेली विशेष सभा पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीकरीता शनिवार दि. 16 जुलै रोजी तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड दि. 17 जुलै रोजी आयोजित केली होती. या निवडणूका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.