मुंबई, : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे नवीन दर (LPG Cylinder Price) जाहीर करण्यात आले आहेत. आज सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आला आहे. दिल्लीत इंडेन सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कोलकातामध्ये 182 रुपयांनी, मुंबईत 190.50 रुपयांनी, तर चेन्नईमध्ये 187 रुपयांनी कमी झाले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने (Indian Oil) व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. त्याचा दर आजही 19 मे रोजीच्या दराने उपलब्ध आहे.
जूनमध्ये इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा दणका बसला होता. याआधी घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी महागली आहे. यामुळे १४.२ किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन जोडणीसाठी ग्राहकांना २ हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. जोडणी शुल्कातील ही वाढ ७७० रुपयांची आहे.
दिल्ली – 1,003 रुपये
मुंबई – 1,003 रुपये
पुणे – 1,006 रुपये
कोलकाता – 1,029 रुपये
चेन्नई 1,019 रुपये
लखनौ 1,041 रुपये
जयपूर 1,007 रुपये
पाटणा 1,093 रुपये