Agniveer Recruitment: केंद्र सरकारची (Central Government) महात्वाकांक्षी योजना अग्निपथ योजनेवरून सध्या देशभरात (Agneepath Scheme) गोंधळ सुरू आहे. देशातील काही राज्यात अग्निपथ योजनेला कडाडून विरोध होत असताना भारतीय लष्कराने (Indian Army) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification For Agniveer Recruitment) जारी केली आहे. विशेष म्हणजे आठवी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांना देखील अर्ज करता येईल.Also Read – Eknath Shinde Not Reachable: उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज आहेत एकनाथ शिंदे.. जाणून घ्या शिवसेना आमदारांच्या मनातील खदखद!
‘अग्निपथ’ योजनेवरून अनेक गदारोळ झाल्यानंतर सरकारकडून योजनेत अनेक बदल देखील करण्यात आले आहे. त्यानंतर देखील या योजनेला विरोध केला जात आहे. दरम्यान, योजनेला देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही संघटनांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंदचा सर्वाधिक फटका देशाची राजधानी दिल्लीला बसला आहे.
भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार, येत्या जुलै महिन्यात अग्निवीर योजनेसाठी नोंदणी सुरू होईल. अग्निवीर भरतीमध्ये सामील होण्यासाठी, सर्व उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या JOININDIANARMY.NIC.IN या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. चार वर्षांसाठी ही भरती केली जाणार आहे. पण त्यानंतर उमेदवारांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा ग्रॅच्युटी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लष्करात 25000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली