अकोला,दि.8:- शासनाने मृग बहार २०२२ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
या योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (कंसात) याप्रमाणे आहे.
संत्रा- ८० हजार रुपये (४ हजार रुपये), लिंबू-७० हजार रुपये (३५०० रुपये), मोसंबी ८० हजार रुपये (४ हजार रुपये), डाळींब-एक लाख ३० हजार रुपये (६५०० रुपये), पेरु-६० हजार रुपये (३ हजार रुपये) याप्रमाणे.
अधिसूचित फळपिके व समाविष्ट महसूल मंडळ याप्रमाणे-
डाळिंब- शिवणी, पेरु, मोसंबी- पातूर ता. पातूर, लिंबू- शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु, कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु., निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु., हिवरखेड ता. तेल्हारा, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी,वाडेगाव, बाळापूर, संत्रा- राजंदा, धाबा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार, तेल्हारा, पातुर, आलेगाव.
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता नेमणूक करण्यात आलेल्या कंपनीची माहिती याप्रमाणे- एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लि., मुंबई- पत्ता व संपर्क क्रमांक- एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लि.,पहिला मजला, एचडीएफसी हाऊस,१६५-१६६ एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट मुंबई -४०००२०, दूरध्वनी क्रमांक०२२-६२३४६२३४, ग्राहक सेवा क्र.-१८००२६६०७००,
इमेल:- [email protected]
तरी शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी संत्रा, लिंबू पेरू या फळपिकाकरिता दि. १४ जुन, डाळिंब पिकाकरिता दि.१४ जुलै, मोसंबी करिता दि. ३० जून या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.