• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बियाणे महोत्सव ‘क्रांती’ची सुरुवात पालकमंत्री बच्चू कडू यांचे प्रतिपादन- पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद;९१२ क्विंटल बियाण्याची विक्री

Our Media by Our Media
June 2, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, शेती
Reading Time: 1 min read
117 1
0
बियाणे महोत्सव
18
SHARES
845
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.2 -: शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने बियाणे महोत्सव एका अर्थाने ‘क्रांती’ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज अकोट येथे केले.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि.१ ते ६ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडला. अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट येथील मुख्य सोहळ्यास विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, अकोट बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर,कृषी उपसंचालक मनोहर मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत म्हणाले की, या महोत्सवात पहिल्याच दिवशी २२०० क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून ९१२ क्विंटल बियाणे विक्री झाले आहे.

आपल्या मनोगतात आ.अमोल मिटकरी म्हणाले की, बियाणे महोत्सव हा शेतकऱ्यांना सन्मान देणारा उपक्रम आहे. असाच सन्मान शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता,आजचा हा उपक्रम त्याचीच आठवण करून देतो. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा पीक पेरा करता यावा यासाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्या,अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी या महोत्सवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या भाषणात पालकमंत्री कडू म्हणाले की, बियाणे महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हिम्मत करावी लागते. शेतकरी शेतकऱ्यांना बियाणे विकत देईल. शेतकरी हा शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही. विविध बियाणे उत्पादक कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात.ही शेतकऱ्याची एक प्रकारची लूट आहे. मात्र केवळ अशी ओरड करून चालणार नाही, त्यासाठी बियाणे महोत्सवाची कल्पना ही एक उत्तम पर्याय आहे. या उपक्रमामुळे किमान ५ ते ६ कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांना होईल, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पाहिल्यास बियाणे महोत्सव हे एक क्रांतीची सुरुवात आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. शेतकरी हा एक संशोधक आहे, हे ही या उपक्रमातून दिसून आले आहे. या उपक्रमाचा पुढचा टप्पा शेतकऱ्यांना खते, फवारणीची औषधें उपलब्ध करून देणे हा असेल,असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.खोत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Akolabacchu kadu
Previous Post

अकोट येथे आरोग्य तपासणी शिबीर; 865 रुग्णांनी घेतला लाभ

Next Post

‘एनी डेस्क’ने कनेक्ट होताय…सावधान! कारण चालू वर्षात झाली 162 जणांची फसवणूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Anydesk

‘एनी डेस्क’ने कनेक्ट होताय...सावधान! कारण चालू वर्षात झाली 162 जणांची फसवणूक

१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन

Sakinaka Rape Case : बलात्कारानंतर गुप्तांगात रॉड घुसवून केला होता खून; नराधम चौहान अखेर फासावर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.