• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऐन मे महिन्यात शेततळ्यात पाणी… पाहुन सुखावले गडकरी

Our Media by Our Media
May 28, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, शेती
Reading Time: 1 min read
137 2
0
Nitin Gadkari
32
SHARES
992
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.28:  मे महिना सरत आलेला, तसा सगळीकडे पाण्याचा ठणठणात असण्याचा काळ, पण या कालावधीतही (दि.28 मे) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर साकारलेल्या शेततलावात भरपूर पाणी पाहून दस्तूरखुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सुखावले. तसे त्यांनी नंतरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलूनही दाखवले.

अमृत सरोवर योजने अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर व बाभुळगाव या प्रक्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने शेततळे निर्माण करण्यात आले आहे. या शेततळ्याची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. यावेळी वणी रंभापूर तलावात जलपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. या पाहणी व भेटी प्रसंगी विधानपरिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील,आ.अमोल मिटकरी, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे विविध विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवरांची निर्मितीची मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात पाण्याचे स्त्रोत वाढावे याकरीता राष्ट्रीय माहामार्गाच्या माध्यमातून शेततळे निर्माण करण्यात आले. त्यातून महामार्गाच्या कामाला लागणारे गौण खनिजाचा वापर करण्यात आला. कृषी विद्यापीठ व पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात 30 शेततळे निर्माण होत असून या प्रक्षेत्राला शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे. शेततळ्याच्या सभोवतालच्या गावांत जलसाठ्यात वाढ होवून सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. शिवाय जलसमृद्धी आली आहे. हातपंप, विहिरी जिवंत झाल्या आहेत. भर उन्हाळ्यातही त्यात पाणीसाठा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात शेततळ्याच्या निर्मितीमुळे सहाशे हेक्टर जमीन ओलीताखाली आणणे शक्य झाले असून हरभरा, करडई पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यामुळे उत्पादनात वाढ होवून उत्पन्न वाढले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Tags: Akolaakola farmerNitin Gadkariwater
Previous Post

मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा सत्यानाश – अशोकराव अमानकर यांचा हल्लाबोल,हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी

Next Post

‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विद्युत रोहित्रावर काम करीत असतांना २७ वर्षीय विठ्ठलाचा मृत्यू,जबाबदार कोण

विद्युत रोहित्रावर काम करीत असतांना २७ वर्षीय विठ्ठलाचा मृत्यू,जबाबदार कोण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.