अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एका शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये ८ वर्षीय बंदुकधारी माथेफिरूने मंगळवार (दि.२४) रोजी एका शाळेत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १८ विध्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शाळेच्या एका शिक्षकाचाही समावेश आहे. यावेळी पोलिसांनी केल्या कारवाईमध्ये माथेफिरूचाही मृत्यू झाला आहे. या शाळेत ५०० मुले शिकत असल्याची माहिती मिळत असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
या घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावुक होऊन म्हणाले, दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका शाळेमध्ये असाच गोळीबार करून २० विध्यार्थ्यांसहित २६ जणांची हत्या झाली होती आणि आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत आहे. यामुळे अमेरिकेत बंदूक वापरण्याबद्दल कडक कायदा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.