शिर्ला अकोला (सुनिल गाडगे) : दि.२४ पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यावरून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले याबाबत शुक्रवार ता . २० रोजी अपात्र घोषित केले . शिर्ला येथील बालू उर्फ अनंत बगाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते . शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे या राहत असलेल्या ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल २२ डिसेंबर २०२१ रोजी दाखल करण्यात आली होती .
त्यावरून जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या अंतिम सुनावणीत शिर्ला ग्रामपंचायत सरपंच सदस्य अर्चना सुधाकर शिंदे यांनी आपली मालमत्ता क्रमांक १४२१ ज्याचे क्षेत्रफळ १०८९ चौरस फूट आहे . या जागेपेक्षा जास्त म्हणजे १८७ चौ फूट इतक्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले . त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १ ९ ५ ९ च्या कलम १४ ( १ ) ज ३ नुसार सदस्य सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले . या महिन्यात ग्रामपंचायतच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र होण्याची जिल्ह्यात ही दुसरे मोठे प्रकरण आहे .