अकोला (प्रतिनिधि)– अकोला जिल्हयातील विविध विकाणी घडलेल्या गोवंश जनावर चोरी, धान्य चोरी, दुकान फोडुन केलेली चोरी याबाबतचे उघडकीस न आलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर साहेब मार्गदर्शक सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा तपास करीत असताना दि. १६/०५/२०२२ रोजी गोपनिय माहीती मिळाली की, शेख मोहसिन शेख मकसुद वय २६ वर्षे रा. अकोट फैल, अकोला याने त्याचे साथीदाराचे मदतीने गोवंश जनावर चोरी केली आहे अशा माहीती वरून त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदाराचे मदतीने ०१) पो.स्टे. बार्शीटाकळी अप.क. १२/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०२) पो.स्टे. बार्शीटाकळी अप. क. ५१ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०३) पो.स्टे. मुर्तीजापुर शहर अप. क. १२४/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. मधिल गोवंश गाय बैल चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याचे कडुन रोख ५९,०००/-रू जप्त करण्यात आले. सदर आरोपी पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. बार्शीटाकळी यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच दि. १६/०५/२०२२ रोजी आरोपी नामे मयुर दिलीप गिरी वय २९ वर्षे रा. सिरसो ता. मुर्तीजापुर याने पो.स्टे. बोरगाव मंजु अप. क. २५/२०२२ कलम ४६१, ३८०, ४२७भा.द.वि. तसेच पो.स्टे. बोरगाव मंजु अप.क. ९७/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. मधिल गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडुन गुन्हयातील ७६००/-रू जप्त करून पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले.
दि.१९/०५/२०२२ रोजी माहीती मिळाली की, आरोपी नामे लक्ष्मण बळीराम दळवी वय ६० वर्षे रा. पिंजर, अकोला व आरोपी नामे मंगेश कसनदास राठोड वय २३ वर्षे रा. जनुना ता. बार्शीटाकळी यांनी परीसातील तुरी चोरी केली आहे अशा माहीती वरून ठाणेदार सपोनि. अजयकुमार वाढवे, पोउपनि, मेश्राम, व पो. स्टाफ पो.स्टे. पिंजर यांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे. बोरगाव मंजु ०१) अप. क्र. ४६ / २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०२) पो.स्टे. बोरगाव मंजु अप.क. ४८/ २०२२ कलम ३७९ भा.द.वि. ०३) पो.स्टे. पिंजर अप.क. १५२/ २०२२ कलम ४६१,३८०,५११ भा.द.वि. मधिल गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडुन ७८,०००/-रू किंमतीची तुर जप्त केली तसेच आरोपी नामे मंगेश कसनदास राठोड वय २३ वर्षे रा. जनुना ता. बार्शीटाकळी याचे कडे असलेली मोटार सायकल हिरो पॅशन प्रो एम. एच. ३७ एम ९००३ किंमत अंदाजे २०,०००/-रू हि पो.स्टे. जऊळका जि. वाशिम अप.क. १३३/२०२२ कलम ३७९ भा. द. वि. मधिल असल्याने जप्त करून आरोपी पुढील तपास कामी पो.स्टे. •बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले. एकंदारीत गोवंश जनावर चोरी, तुर चोरी, मोटार सायकल चोरी व इतर चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,६४,०००/- रु. मुददेमाल जप्त करून ०४ आरोपी अटक करण्यात आले.
सदरची कार्यवाही मा, पोलीस अधिक्षक श्री जी श्रीधर सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत मॅडम, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरत बोरकर, नितीन ठाकरे, नापोकॉ गोकुळ चव्हाण, पो. कॉ. लिलाधर खंडारे, पो.का स्वप्निल खेडकर पो को अन्सार शेख, ना. पो. कॉ/ नफीस शेख, अक्षय बोबडे, पो.कॉ. विजय कबले यांनी केली.