• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार :लोकसहभागाची किमयाः34 प्रकल्पांमधुन काढला 30 हजार 637 घनमिटर गाळ ; 394 शेतकऱ्यांना लाभ

adil by adil
May 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, संपादकीय
Reading Time: 1 min read
88 1
0
वाघा, ता. बार्शी टाकळी
14
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  धरणांमध्ये साठलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे;त्यातून शेतजमीन अधिक सुपिक करणे व धरणांची साठवण क्षमता वाढविणे असा दुहेरी लाभ असलेला उपक्रम सध्या जिल्ह्यात राबविला जात आहे. दि.1 मे पासून सुरु झालेल्या या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, उपक्रमामुळे आतापर्यंत (दि.18) 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला आहे. यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्णतः लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.दि. 15 जून पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दरवर्षी पावसाच्या पाण्यासोबत गाळ वाहून धरणांमध्ये साठतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे धरणांच्या साठवण क्षमतेत सातत्याने घट होत आहे. त्यासाठी धरणांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास शेतीची सुपिकता वाढते व धरणांच्या साठवण क्षमतेतही वाढ होते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अकोला जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान दि.1 मे पासून राबविले जात आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात अकोला पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. अकोला या विभागांच्या अखत्यारीतील जलसाठ्यांतील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 34 ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा गाळ काढला जात आहे. त्यात अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील आठ, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तीन, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील आठ तर लघुपाटबंधारे विभाग जि.प. अकोला यांच्या अखत्यारीतील  15 प्रकल्पांमध्ये हे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (दि.18 अखेर) सर्व प्रकल्प क्षेत्रातील मिळून 394 शेतकऱ्यांच्या शेतात हा गाळ टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत हे काम सुरु राहणार आहे.

गाळ काढण्यात येत असलेले प्रकल्प (काढण्यात आलेला गाळ घनमिटर मध्ये कंसात)-

अकोला पाटबंधारे विभाग (एकूण 15506)- उमा मध्यम प्रकल्प(8905), इसापूर लघु प्रकल्प(816), घोटा लघु प्रकल्प(340), मोझरी लघु प्रकल्प(350), पि. हांडे लघु प्रकल्प(225), मोऱ्हळ प्रकल्प (700), काटपूर्णा प्रकल्प (3390) शहापूर वृहत ल.पा. यो. (780).

लघुपाटबंधारे विभाग, अकोला(एकूण 3000)- उमा प्रकल्प (3000)

मृदा व जलसंधारण विभाग (6906)- भीलखेड तलाव-बोरी ग्रा.पं.-(80), अमबाडी ग्रा.पं.)90), राजुरा ग्रा.पं.(70), अकोली जहांगिर (80), सावरगाव ल.पा. (1248), आस(265), कुंभारी ल. पा. तलाव (123), शिवकालीन गाव तलाव राजनापूर खि.-9900.

लघु पाटबंधारे विभाग, जि.प. अकोला (5225.88)- अनकवाडी गावतलाव-1103.7, घुसर गाव तलाव(1337.18), देवर्डा गाव तलाव (480), मुंडगाव ई-क्लास शेततळे(540), दीपमाळ पाझरतलाव(150), एदलापूर गाव तलाव (100), आळंदा गाव तलाव(190), शेतगाव सिंचन तलाव(105), भेंडी महाल सिंचन तलाव(90), अनभोरा शिवकालीन तलाव (380), दधम गाव तलाव (200), देगाव गाव तलाव(200), उमरा सिंचन तलाव (180), पिंपरडोली सिंचन तलाव पेलका (110), शेकापूर सिंचन तलाव (60)

असा एकूण सर्व 34 प्रकल्पांमधून 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. 394 शेतकऱ्यांच्या शेतात हा गाळ टाकण्यात आला आहे. हे काम पूर्णतः लोकसहभागातून सुरु आहे. शेतकरी स्वतः गाळ काढून आपल्या शेतात वाहून नेत आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

तीन लक्ष घनमिटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या प्रकल्पातून अधिकाधिक गाळ येत्या 15 जून पर्यंत काढावयाचा आहे.  त्यासाठी तीन लक्ष घनमिटर गाळ  काढण्याचे उद्दिष्ट आहे. गावातील नाले, नद्यांमधील गाळ काढून तो काठाने टाकणे. त्यावर पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड करणे इ. कामे या मोहिमेत करण्यात येणार आहेत. यामुळे पुरनियंत्रण, शेती सुपिक करणे इ. फायदे होतात. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Tags: akola newscampsfarmersparticipation
Previous Post

Check bounce : चेक बाउंसप्रकरणी विशेष न्यायालये सुरु करा ! महाराष्ट्रासह पाच राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post

जून महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
-anna-yojana

जून महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

student-scholarships

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.