अकोला– महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार अभ्याक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी अर्ज मागविण्यात आले असून हे अर्ज भरण्याची मुदत दि. 6 जून पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक अटी व शर्तीची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी कळविले आहे.