• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबविलेले विशेष अभियान; शिधापत्रिकांसंदर्भात 27 हजारांहून अधिक तक्रारींचा निपटारा

adil by adil
May 17, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, योजना, संपादकीय
Reading Time: 1 min read
84 1
0
bachhu kadu
34
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला–  जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निर्देश दिल्यानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल ते 15 मे तसेच त्याआधी 25 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव व रेशनकार्ड संदर्भात तक्रारींचा निपटारा करण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांमध्ये अनुक्रमे 13072 व 14599 असे एकूण 27 हजार 671 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना शिधापत्रिका मिळणे व त्यासंदर्भातील अन्य कामे जसे नावे वगळणे, नावे समाविष्ट करणे, शिधापत्रिका विभाजन करणे इ. हे सहजरित्या व्हावे यासाठी रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकांची संख्या 3 लाख 25 हजार 115 इतकी आहे. कुटुंबातील नावे कमी होणे, नविन सदस्य कुटुंबात येणे, कुटुंबांचे विभाजन होऊन नव्या शिधापत्रिकेची आवश्यकता भासणे, स्थलांतरामुळे नव्या ठिकाणी शिधापत्रिका स्वस्त धान्य दुकानाला जोडणे अशा प्रकारची कामे प्रशासनाकडे जाऊन करावी लागतात. त्याबाबत या कामांचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून विशेष अभियान राबविण्यात आली. जिल्ह्यात एकाच वेळी रेशनकार्ड तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. या अभियानांमध्ये दिव्यांग व्यक्ती, अनाथ व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती अशांना प्राधान्याने शिधापत्रिका देऊन लाभ देण्यात आला.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने दि.25 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत रेशनकार्ड संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविले होते. या मोहिमेत 2180 नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या. 6633 दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. 2954 प्रकरणी शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करण्यात आले. 2500 प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे कमी करण्यात आली. तब्बल 14599 कार्डधारकांच्या तक्रारींचा निपटारा या अभियानात करण्यात आला.

तसेच दि.11 एप्रिल ते 15 मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव या अभियानात जिल्ह्यातील 883 गावांपैकी 686 गावांमधून तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यात 8616 जणांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आली. 2370 प्रकरणांत शिधापत्रिकेतील नावे समाविष्ट करण्यात आली. 2086 प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे वगळण्यात आली. अशी एकूण 13072 प्रकरणांवर कारवाई पूर्ण झाली. एकूण दोन्ही अभियानात मिळून  27,671 प्रकरणांचा निपटारा या दोन्ही अभियानात करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी दिली.

Tags: Guardian Ministerration cardsSettlement
Previous Post

पालकमंत्र्यांकडून डॉ. उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन

Next Post

कंत्राटी कला शिक्षक,संगणक शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा दि.29 रोजी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
tribal-

कंत्राटी कला शिक्षक,संगणक शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा दि.29 रोजी

शाळा;

पाटसूल येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा;प्रवेश प्रक्रिया सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.