• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा

adil by adil
May 9, 2022
in Featured, महाराष्ट्र, संपादकीय
Reading Time: 1 min read
81 0
0
१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा
33
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याबरोबर सावंतवाडीतील पत्रकार विनायक गांवस यांना विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आल्या संदर्भात. दाद मागण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई च्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी 17 मेला धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

याबाबतची चर्चा गंगाखेड परभणी येथील राज्यातील तालुकास्तरावर आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झाली. यावेळी परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्याशी चर्चा झाली. व त्यांनी याप्रकरणी तातडीने आंदोलन करण्याचे आदेश दिले. तर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे इशारा दिला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

दै.कोकणसाद चे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गांवस हे वृत्तांकन करण्यासाठी कोलगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रांमध्ये गेले असता त्यांना नाहक गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारावर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापुढे पत्रकारांना काम करणे कठीण होणार आहे. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मंगळवार 17 मे २०२२ रोजी अ भा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील इतर पत्रकारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

परिषदेने शासनाकडे पत्रकारांच्या विविध प्रश्नाबाबत च्या मागण्या वेळोवेळी सादर केल्या आहेत. यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना लागू झाली मात्र ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रस्तावात त्रुटी काढून अधिकाऱ्यांकडून ते प्रस्ताव नामंजूर केले जातात. या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा तालुका व जिल्हास्तरावर धरणे आंदोलनाचा निर्णय परिषदेने घेतला आहे . याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तील गांवस यांच्या बाबतच्या या घटनेचा निषेध करण्यात आला असल्याचे परिषदेने प्रसिद्धीस दिले आहे.

दरम्यान २० एप्रिलच्या मध्यरात्री अचानक करण्यात आलेले वीज भारनियमनामुळे नागरिक हैराण होते ते संतप्त झाले. त्यामुळे नागरीक लगेच तिथे पोहोचले. वरिष्ठ वीज अधिकारी व कर्मचारी यांनी फोन,मोबाईल वर रिप्लाय दिला नाही,त्यामुळे नागरीकांना स्पष्टीकरण मिळाले नाही, त्यामुळे ज्या काही घटना घडल्या ह्या माँपसायकाँलोजीमुळे त्या घडून गेल्या.या घटनेचे लाईव्ह करत असताना वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांनी किमान आपल्या मोबाईलवरूंन संतप्त नागरीकांसमोर वेळेत आपली बाजू मांडली असती तर कदाचित पुढील घटना टाळता आली असती. फेसबुक लाईव्हवर त्यांचेही म्हणणे आले असते.

त्यासाठीही दै.कोकणसाद चे प्रतिनिधी प्रयत्नशील होते. इतकेच काय, घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी येथील पोलिसांना फोन करून त्याची माहितीही दिली.पोलिसांनीही आपल्या परिने परस्थिती हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तसे न होता उलट पत्रकार विनायक गांवस यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या उपस्थिती मध्ये पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या कानी घातली व निवेदनही सादर केले तत्पूर्वी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर तसेच सावंतवाडी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर िंसधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य हरिश्‍चंद्र पवार यांनी वेळोवेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेऊन निवेदने देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली व पत्रकार गावस याला या प्रकरणांमध्ये गोवले जात असल्याची बाब लक्षात आणून दिली तरीही या प्रकरणात अन्यायकारक पत्रकाराचे नाव समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 17 मेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Tags: Gajanan NaikMarathi Press Council
Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा; ४३६ उमेदवारांचा सहभाग : १४२ जणांची प्राथमिक निवड

Next Post

देशाचा प्रजनन दर घटला

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Country-fertility-rate-decreased

देशाचा प्रजनन दर घटला

Temperature-summer (1)

पारा जाणार 45 अंशांवर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.