अकोला जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू ऊपाख्य ओमप्रकाश कडू यानी जिल्ह्यातील तिन रस्त्यांचे कामात १ कोटी ९५ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी वंचित आघाडी नेता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचे तक्रारीवरुन व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पूर्व मंजूरीने तथा अकोला जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेशाने अखेर अकोला सिटी कोतवाली ठाण्यात बच्चू कडू यांचे विरोधात फसवणूकीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यवाहीने जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे.
अकोला जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३ रस्त्यांमध्ये पालकमंत्री नामदार बच्चू कडू यानी १ कोटी ९५ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याची तक्रार वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश ऊपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यानी अकोला सिटी कोतवाली ठाण्यात केली होती.
मात्र या संदर्भात पोलीसानी कोणतीच हालचाल केली नाही. त्याने व्यथित होऊन पुंडकर यानी कलम १५६ (३) अंतर्गत अकोला जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यानी नामदार बच्चू कडूंविरोधात पुरावेही सादर केले. मात्र लोकप्रतिनिधी विरुद्ध गुन्हा दाखल करणेसाठी ९० दिवसाचे कालावधित राज्यपालांची मंजुरी आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यावर डॉ. पुंडकर यांनी बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करण्याची मंजुरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडून मिळविली.
ही मंजुरात अकोला न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर अकोला सत्र न्यायालयाने या बाबतित चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचा आदेश आकोला सिटी कोतवाली पोलीसांना दिला. त्यावरुन पोलीसानी दि. २६ एप्रिलचे रात्री बच्चू कडू यांचेवर भादवी ४०५, ४०६, ४०९, ४२०, ४६८ व ४७१ अन्वये फसवणूकीसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. ह्या घटनेने अवघ्या राज्यभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे.
यावर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी फेसबुकवर पोस्ट करीत म्हटले…वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी लावलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. याविषयी एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार झाला असेल तर मी माझे हात कलम करणार.