महाराष्ट्रात अशांतता निर्माण केला जात आहे, हे खरं आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी नाही, याची काळजी घेतली जाईल. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. भोंग्यांसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी बैठक घेतली जाणार आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्मावरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई आणि बेकारी या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी धर्मिक मुद्द्यांवर वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे”, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज माध्यमांना सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, “केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केलं जात आहे. विशिष्ट लोकांनाच केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्राकडून राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप सुरू आहे. अमरावतीत घटनांमागे कुणाचा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. तिथे काही घटक जास्त सक्रीय झाला आहे, त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.