पातुर (सुनिल गाडगे): पातुर तालुक्यातील ग्रामीण परीसरात असलेले चान्नी पोलीस स्टेशन हद्दी मध्ये गाव तेथे वरली , जुगार अड्डा सुरळीत अर्थपुर्ण चालु असल्याने मोल मजुरी करणारे व युवक व्यसनाधीन झाले आहे.
गेल्या दीड वर्षा पासुन चान्नी पोलीस स्टेशनच्या मोठ्या गावात सर्रास पणे अवैध जुगार अड्डे खुलेआम चालु असुन या अड्याना चालु करण्यासाठी जसा सरकारी परवाना दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .चान्नी पोलीस स्टेशन हद्दी मधील आलेगाव , चान्नी , सस्ती , चोंढी , जांब , झरंडी,विवरा अश्या अनेक मोठ्या गावामध्ये अवैध जुगार व वरली मटक्याची खायवळी मोठ्या जोर्रात चालु आहे. या अवैध व्यवसायासाठी चान्नी पोलीस मोठी धावपळ करतांना दीसतात .चान्नी पोलीस स्टेशन क्राईम रिपोर्ट व्यवस्थित राहवा या करीता थातुर मातुर कागदोपत्री कार्यवाही करण्यात येते. चान्नी पोलीस स्टेशनच्या प्रत्येक बिट मध्ये खुलेआम अवैध वरली मटका व जुगार चालु आहे . चान्नी पोलीसांचे पितळ 31 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विषेश पथकाच्या धाडीवरुन उघड पडले आहे .विशेष पथकाने आलेगाव , विवरा येथे धाडी टाकुन ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन चार जणावर जुगार अँक्ट प्रमाणे कार्यवाही केली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक जर अकोल्यावरुन येऊन अवैध व्यवसायवर कार्यवाही करु शकतात ! तर चान्नी पोलीस किती अकार्यक्षम आहे हे दीसुन येते