अकोला- सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेल्या निर्भय बनो जनआंदोलन, अकोला जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा, सर्वतालुका, अकोला महानगर सर्व मोठे शहरे,ग्राम पंचायत, पंचायत समिती सर्कल, जिल्हा परिषद सर्कल, वार्ड तेथे शाखा काढन्या करीता संपूर्ण जिल्हाभर निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने दिनांक .२ एप्रिल २०२२ नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून ते 16 एप्रिल२०२२ हनुमान जयंती पर्यंत सदस्य पंधरवाडा मोहीम आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजकार्याची आवड असलेल्या जागृत चरित्रशील ,राष्ट्रहिताचा विचार करून मानवी जीवनातील आपले कर्तव्य, काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपल्या संपूर्ण बायोडाटा सह निर्भय बनो जन आंदोलनाकडे अर्ज भरून द्यावेत. या पंधरवड्यामध्ये निर्भय बनो जन आंदोलनाचे कार्यकर्ते लोकांना जनआंदोलनाचे महत्व ,ध्येयधोरण , उद्देश व कार्य समजून सांगून या मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरता जागृती करणार आहे .यानंतर लगेच विधानसभा ,तालुका ,शहर महानगर , जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, ग्रामपंचायत स्तरावर कार्यकारिणी गठित केल्या जाणार आहेत .आदी सर्व जनआंदोलनाच्या शाखा संपूर्ण जिल्हाभर तयार करणार आहेत. तसेच महिला संघटन, युवक संघटना ,कामगार संघटन, शेतकरी संघटन, मजूर संघटन, विद्यार्थी संघटन, ऑटो, काली पिली युनियन, ट्रक , ट्रॅक्टर युनियन. असंघटित कामगार युनियन, अंगणवाडी सेविका युनियन, सुशिक्षित बेरोजगार संघटन आदी संघटनात्मक बांधणी या पंधरवड्यात अकोला जिल्हाभर केली जाणार आहे. आणि सर्वात शेवटी अकोला जिल्ह्याची जिल्हास्तरीय बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील समाजकार्याची आवड असलेल्या अन्याय-अत्याचार भ्रष्टाचाराची चीड असलेल्या लोकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन जन आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याकरता संयोजक ,गजानन हरणे ,घर क्रमांक C/68.जिल्हा परिषद नगर ,खडकी बु. अकोला मोबाईल नंबर. , ९८२२९४२६२३ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आव्हाना निर्भय बनो जण आंदोलन अकोलाच्या वतीने संयोजन गजानन हरणे, डॉ.कृष्णकांत वक्ते , प्रमोद धर्माळे अकोला महानगर, तालुक्यातून नारायण मानकर बाळापुर , विलास नसले मुर्तीजापुर, गजानन वारकरी अकोट, राजेश खारोडे तेल्हारा, प्रमोद बोपटे अकोला, देवानंद गहिले पातुर, अतुल देशमुख बार्शिटाकळी, आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.