एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price) दरवाढीचा फटका बसला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता २,२५३ रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही.
१९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder Price) किंमत १ मार्च रोजी २०१२ रुपये होती. तर २२ मार्च रोजी त्यात घट होऊन दर २००३ रुपयांवर आला. पण आज १ एप्रिल रोजी या सिलिंडरची किंमत २,२५३ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत या सिलिंडरसाठी आता १,९५५ रुपये ऐवजी २२०५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये २,३५१ रुपये, चेन्नईत २,४०६ रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी १ मार्च रोजी १९ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत ९ रुपयांनी कमी झाली होती.
१ एप्रिल म्हणजेच आजपासून २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. याचबरोबर अनेक नियमही बदलतील. याचा परिणाम आपली कमाई, खर्च आणि गुंतवणुकीवर पडणार आहे.