तेल्हारा: नगरपरिषद मध्ये अभियंता मंगेश बनकर हे अनेक वर्षांपासून नियमबाह्य मानधनावर कार्यरत असल्याची तक्रार पोहरकार यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली, असता जिल्हाधीकारी निमा अरोरा यांनी तक्रारिवर सुनावणी घेत सदर नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने त्यांच्या सेवा समाप्ती चे आदेश नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना दिले.
नगर परिषद मध्ये मंगेश बनकर हे 2007 पासून मानधन तत्त्वावर अभियंता या पदावर कार्यरत होते. त्यांच्या वेळेवर उदभवणारी परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा, बांधकाम स्वच्छता या सारख्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी आपली जबाबदारी हाताळत नगर परिषदेचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारी यांची मने जिंकली त्यामुळे सतत ते आपल्या पदावर कार्यरत राहिले अनेक कर्मचारी हे सेवानिवृत्त झाल्याने किंवा बदली झाल्याने त्यांच्याकडे महत्वाच्या पदाची जबाबदारी आली होती मात्र पोहरकार यांनी सदर अभियंता यांची नियुक्ती ही नियम बाह्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कडे केली त्यावर जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेत सदर नियुक्ती ही नियमबाह्य असल्याने नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना आदेश देऊन बनकर यांच्या सेवासमाप्ती चे आदेश बजावले.
आज जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहरकार यांनी दिलेल्या तक्रारिवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाली असता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अभियंता बनकर यांच्या सेवासमाप्ती चे आदेश दिल्याने आदेशानुसार उद्या पुढील कार्यवाही केली जाईल.
राजेश गुरव
मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा