अकोट (देवानंद खिरकर)- उपविभागीय अधिकारी,तथा तहसीलदार साहेब आकोट यांना भारिप बहुजन महासंघा तर्फे निवेदन देण्यात आले. आकोट शहरातील व ग्रामीण भागातील रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी यांच्या पासून संबंधित अधिकारी व त्यांचे दलाल पैशाची मागणी करीत आहेत. रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजना ही शासनाने गरीब वर्गाला चांगले घर मिळावे या हेतूने चालू केलेली आहे. पण या मध्ये घरकुला पासून गरीब गरजु लाभार्थी वंचित राहत असून ज्यांचे पक्के घर आहे. अशा लोकांची नावे घरकुल यादीत मंजूर आहेत.गरजू लाभार्थी यांचे घरकुलच्या मंजूर यादीत नाव नसल्यामुळे संबंधित अधिकारी व त्यांचे दलाल लाभार्थी यांना म्हणतात कि तुमची घरकुलची फाईल मंजूर करून देतो असे सांगून गोरगरीब लोकांना पैशाची मागणी करीत आहेत.
व गरीब लोकांची या मध्ये लूट होत आहे. करिता आपण या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित अधिकारी व त्यांचे दलाल यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अंन्यथा भारीप बहुजन महासंघ आकोट तर्फे आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. असे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी नितीन तेलगोटे,विक्की तेलगोटे, आशिष रायबोले, अमन गवई, मयूर सपकाळ,चेरण इंगळे, प्रवीण सोनोने, राजकुमार सोनोने, नवनीत तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, रामेश्वर दाभाडे, राजु भोंडे, विशाल पडघामोल, आकाश सोनोने, गणेश नेमाडे, अतिक जेमदार, त्यांची उवस्थिती होती.