• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बारावीचा रसायनशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटला, प्रश्नपत्रिका उत्तरासह व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल

Our Media by Our Media
March 14, 2022
in Featured, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
156 1
0
Talathi Exam
33
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंदा: मुंबईतील मालाड येथे बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज सोमवारी गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यापासून बारावीची सुरू आहे. ऑफलाईन परीक्षेत आजचा गणिताचा पेपर फुटल्याने एकच गोंधळ उडाला आहे. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास आधी प्रश्नपत्रिका उत्तरासह मोबाईलच्या व्हॉट्स अॅपवर आली. शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी परीक्षा झाली नाही. यावर्षी ती ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाचा पेपर होता. मात्र तत्पुर्वीच सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासह मिळाली.

उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे. या परीक्षेसाठी तालुक्‍यात सुमारे तीन हजार विद्यार्थी बसले आहे. मोबाईलवर सोशल मीडियातून प्रश्नपत्रिका उत्तरासह व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, याबाबत शिक्षण विभाग तसेच शिक्षकांना कुठलीच माहिती नसल्याचे समजते. मात्र सदर प्रतिनिधीने यांच्याकडे याबाबत प्रश्नपत्रिका पाठवून विचारणा केली असता फुटलेली प्रश्नपत्रिकाही परीक्षेतील असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी एका विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा आज सुरू होती. यातच गणिताचा पेपर फुटल्याने सावळागोंधळ समोर आला आहे. या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी पालकांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवर अगोदर मिळालेली प्रश्नपत्रिका परीक्षेतील एकच असल्याचे मान्य केले. मात्र हा प्रकार श्रीगोंद्यात झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Tags: 12thchemistryMathematicsquestion paperWhatsapp
Previous Post

CWC : पराभवानंतर काॅंग्रेस कार्यकारिणी समितीची मोठी बैठक सुरू

Next Post

महत्वाची बातमी! भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
crude oil

महत्वाची बातमी! भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणार

akola news

जिल्ह्यात बुधवार (दि.१६) पासून कलम ३६ लागू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.