तेल्हारा: बसस्थानकाचे गेटजवळ सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या तर ग्राम आडसुळ येथे हे.कॉ. विजय जांभळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींवर १० मार्च रोजी एकाच दिवशी छापेमारी करून १४ हजार ८४० रुपये किमतीची अवैध व विना परवाना देशी दारु जप्त करून कारवाई केली.
ग्राम आडसुळ येथे बाणुबाई रमेश आमझरे (६५) या महिलेच्या राहत्या घरात पोलिसांच्या छापेमारीत १० मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजता देशी दारुचे ९० मिलीचे २० क्वार्टर किंमत ८०० रुपये नायलॉन थैलीतून पंचासमक्ष फिर्यादी सहाय्यक फौजदार विजय जांभळे यांनी जप्त आहेत.
करून रात्री ९ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या ६५ (ई) कलमान्वये गुन्हा दाखल • केला तर फिर्यादी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मोबाईल फोनवर गुप्त व खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोउनि रमेश धामोडे, पो. कॉ. सरोदे, एनसीपी १९४७ यांच्यासह सपोनि फड बसस्थानक तेल्हाराचे पश्चिम गेटजवळ घटनास्थळी दाखल होऊन पंचासमक्ष आरोपी सचिन शांतीलाल जमालपुरे (३०) रा. जिजामाता नगर तेल्हारा यास रंगेहात पकडले असता त्याच्या ताब्यातून अवैध व विनापरवाना देशी दारूच्या १८० मिलीच्या १९२ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १४ हजार ८४० रुपये आहे. तेल्हारा व आडसुळ येथील कारवाईत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले