अकोट: जागतिक महिला दिनी भूमी फाऊंडेशन व मेलोडियस ग्रुप अकोट च्या वतीने शहरातील दिव्यांग महिलांचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर मॅडम, तथा अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे, AJFC चे जिल्हाध्यक्ष संजय आठवले, पोलीस निरीक्षक शुभांगी कोरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दिव्यांग महिलांचा साडी चोळी देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी रितू खोखर यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार भूमी फाऊंडेशन च्या अध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी केला तर पोलीस निरीक्षक शुभांगी कोरडे यांचा सत्कार अकोट शहरचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे यांचा सत्कार AJFC चे जिल्हाध्यक्ष संजय आठवले यांनी केला.या प्रसंगी मेलोडियस ग्रुपचे अध्यक्ष योगेश वर्मा, नायब तहसीलदार राजेश गुरव, पोलीस उप निरीक्षक गणेश पाचपोर, पो कॉ. हिंमत दंदीं, श्रीकृष्णा वानखडे,सिध्दात वानखडे, सुदाम राजदे, प्रमोद येऊल, कन्हैय्यालाल गौर,सुनीताताई चायल,कीर्ती पितांबरवाले,लावण्या भोजने, अजय तेलगोटे व भूमी फाऊंडेशन चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन प्रकाश गायकी तर आभार प्रवीण पूंडगे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य महीलाची उपस्थिती होती.