• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील खरेदीदार भारताकडे वळले, ५ लाख टन गहू निर्यातीचे झाले करार

Our Media by Our Media
March 9, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
139 1
0
Wheat
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:  रशिया- युक्रेन युद्धामुळे या देशांतून युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. अलीकडील काही दिवसांत भारतातून सुमारे ५ लाख टन गहू निर्यातीसाठी व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगात धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाल्याचे वृत्त Reuters ने दिले आहे.

रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे. दरम्यान, भारतात सलग वर्षे गव्हाचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा शिल्लक आहे. यामुळे व्यापारी आता निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

“जागतिक बाजारातील किमतीतील वाढीमुळे भारतीय पुरवठादारांना गव्हाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे सोपे झाले आहे,” असे एका जागतिक ट्रेडिंग फर्ममधील एका डीलरने म्हटले आहे. देशांतर्गत विक्रीसाठी उत्पादकांना सुमारे २५७ डॉलर प्रति टन दर हमी देतो, तर युरोपियन गव्हाच्या बेंचमार्क किमती (benchmark European wheat) ४०० युरो (४३५ डॉलर) च्या वर गेल्या आहेत आणि शिकागोमध्ये गव्हाच्या बेंचमार्क किमती १४ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.

भारत करणार ७० लाख टन गव्हाची निर्यात

भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत आहे. “युक्रेन आणि रशियाकडून पुरवठा खंडित झाल्यामुळे खरेदीदार भारताकडे वळले आहेत. केवळ भारतच गव्हाचा मोठा, स्थिर पुरवठादार करु शकतो आणि म्हणूनच ते भारताकडे वळले आहेत,” असे एका डीलरने म्हटले आहे.

ब्रेडबास्केट‍‍‍वर संकट

युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश (Black Sea region) हा सुपीक आहे. हा भाग जगाचा ब्रेडबास्केट (Breadbasket of the World) म्हणून ओळखला जातो. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू (wheat) आणि बार्लीचे (barley) मोठे निर्यातदार देश आहेत. जगातील गहू आणि बार्लीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात या दोन देशांतून होते. युक्रेन मक्याचादेखील एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि सूर्यफूल तेल निर्यातीत तो जगात आघाडीवर आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकऱ्यांनी (Ukrainian farmers) देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. बंदरे ओस पडल्याने येथून जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचबरोबर कृषीसंपन्न असलेल्या रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात कमी होऊ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags: Russia Ukrainewheat
Previous Post

महिला मुक्ती मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यांग महिलांचा सत्कार

Next Post

एक महिन्यात हिवरखेड नगरपंचायतची घोषणा होणार…! हिवरखेड वासीयांच्या २५ वर्षांच्या सामूहिक संघर्षाला यश मिळणार!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Hivrakhed

एक महिन्यात हिवरखेड नगरपंचायतची घोषणा होणार...! हिवरखेड वासीयांच्या २५ वर्षांच्या सामूहिक संघर्षाला यश मिळणार!

अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा अकोला बार महिला विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिन साजरा

अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा अकोला बार महिला विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिन साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.