प्रत्येक नात्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्ती विषयी जास्त जाणून घ्यायचे असते. तेही जेव्हा नातं प्रेमाचं असेल तर, तेव्हा त्यांच्याबद्दल अधिक समजून घ्यावंसं वाटतं. सोशल मीडियाला भेट देऊन आम्ही त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेतो. त्यांचे फोटो, त्यांची पसंत नापसंत जाणून घ्यायचे असते. कधी-कधी तुमचा क्रश तुम्हाला (WhatsApp) व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फॉलो करत असतो आणि तुम्हाला माहिती नसते. या चिन्हांद्वारे तुम्ही समजू शकता की तुमचा क्रश तुम्हाला फॉलो करत आहे.
अनेकदा असं होतं की, आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटतं. त्यांच्या WhatsApp वर काही संदेश आपण टाइप करतो आणि नंतर ते पुन्हा डिलीट करतो. त्यांना संदेश देण्यासाठी आपण काय बोलावे याचा विचार करतो. त्याचप्रमाणे जर कोणी तुमच्यासाठी काही मेसेज टाईप करून डिलीट करत असेल आणि असे वारंवार होत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. कदाचित समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावर क्रश आहे. त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे पण ते सांगता येत नाही.
जर तुम्ही तुमचा प्रोफाईल पिक्चर बदलला असेल आणि लगेचच त्याचा मेसेज तुम्हाला येत असेल आणि तो तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारू लागत असेल तर याचा अर्थ असा होतो की, तो तुमच्यावर नजर ठेवून आहे. तो तुमची प्रत्येक छोटी गोष्ट काळजीपूर्वक पाहतो. त्यामुळे प्रोफाइल पिक्चर बदलताच त्यांचा मेसेज लगेच येतो. तुमच्याही अशाच काही गोष्टी लक्षात आल्या असतील तर तुम्ही हे समजून घ्यायला हवे की, समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
कदाचित त्याचा तुमच्यावर क्रश असेल. जर कोणी तुम्हाला (WhatsApp) व्हॉट्सअॅपवर कॉल करतो आणि लगेच तो कट करतो. जेव्हा तुम्ही त्याला कारण विचारता तेव्हा तो म्हणतो चुकून कॉल लागल्याचे सांगतो. जेव्हा असे पुन्हा पुन्हा होते तेव्हा समजले पाहिजे की काहीतरी गडबड आहे. जर तुमच्याही व्हॉट्सअॅपवर मिस्ड कॉलच्या चुका लक्षात आल्या असतील आणि त्या वारंवार घडत असतील, तर या चुका पुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा तुमच्यावर क्रश असण्याची शक्यता आहे, त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, तो तुमची प्रोफाइल पाहत आहे.
त्याला मेसेज करताच त्याला लगेच ब्लू टिक होते आणि तो त्याला रिप्लाय देऊ लागतो. यावरून तुम्ही समजू शकता की त्याचा तुमच्यावर क्रश असू शकतो आणि ते तुमची विंडो उघडून बसला असेल. एक ब्लू टिक लगेच होणे म्हणजे समोरची व्यक्ती ऑनलाइन आहे आणि तात्काळ उत्तर देणे म्हणजे तो तुमच्या विंडोवर आहे. यावरून तो तुम्हाला जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी किती उत्सुक आहे हे समजू शकते.