अकोला,दि.27:- आपला देश हा विविध धर्म, पंथ, विचारांच्या लोकांनी बनलेला आहे. आपल्या देशातील तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवायचा असेल तर या सर्व घटकांची एकता आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहून तळागाळातील लोकांच्या विकासासाठी कार्य करु,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी कोविड नियमांचे पालन करीत हा सोहळा पार पडला. येथील लालबहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी , लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.
पुरस्कार, पारितोषिक वितरण व कॉफी टेबल बुकचे विमोचन
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देणाऱ्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, आर.आर. आबा सुंदर गाव स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायती तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भित्तीचित्र स्पर्धाः- बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे हेमंत उत्तमराव उपरीकर प्रथम, अनिकेत धर्मराज मंडलेकर व्दितीय, प्रतिक महेश वाघ तृतीय तर दिपुजा राजेंद्र हरणे, संतोष डिंगाबर राऊत व नंदु वासुदेव गवई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार (2019-20)
कानडी ग्रा.पं. ता. अकोला-सरपंच सैय्यद मुमताजबी इसाक,
जितापुर ग्रा. पं. ता. अकोट- सरपंच विठ्ठल मंगळे,
बहादुरा ग्रा.पं. ता.बाळापूर-सरपंच अनिताताई माळी,
पाटखेड ग्रा.पं. ता. बार्शिटाकळी- सरपंच महादेवराव मानकर,
मधापुरी ग्रा.पं. ता.मुर्तिजापूर- सरपंच प्रदीप ठाकरे यांना प्रदान करण्यात आले.
(2020-21)
कापसी ग्रा.पं. ता. अकोला- सरपंच अंबादास उमाळे,
अकोलखेड ग्रा.पं. ता.अकोट- सरपंच रत्नप्रभाबाई निचंळ,
शेळद ग्रा.पं. ता. बाळापूर- सरपंच सागर उपरवट,
राजुरा ग्रा.पं. ता.मुर्तिजापूर-सरपंच वनमालाताई आखरे यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हा क्रीडा पुरस्कारः-
महिला गटातून विधी राकेश रावल(बॉक्सिंग)
पुरुष गटातून सुदर्शन येनकर (बॉक्सिंग).
भव्य रांगोळी कलावंत अमृता शेनाड व चमू यांना तसेच
संगणक परिचालक गणेश नाईक यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
तसेच सामाजिक कार्याकरीता जावेद जकारीया व त्याच्या चमूस, नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या मदत कार्याबद्दल दीपक सदाफळे व संत गाडेगाबाबा चमू, वंदे मातरम आपात्कालीन पथक व जिल्हा आपत्ती पथकातील सुनिल कल्ले व हरिहर निमकंडे यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.