हिवरखेड:- हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या वारी पिपरखेडं मार्गावर गोपनीय माहितीद्वारे १२ तडफदार बैल बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी शहानिशा केली असता, त्या गुरांच्या अंगावर जखमा दिसल्या यावरून असे समजते हे गुरे कत्तली करिता जात होते. ही कारवाई १२ जानेवारीच्या सकाळी करण्यात आली आहे विशेषतः म्हणजे वारी पिपरखेडं हा मार्ग पोलीस स्टेंशन जवळून तंबल २० की. मी अंतर आहे.
या २० किमी अंतरावरून ठाणेदार धीरज चव्हाण व हिवरखेड बिट जमदार सोळंके यांनी ही १२ गुरे पायी चालत आणले. ठाणेदार हे नेहमी सकाळ, संध्याकाळ वाकिंग करतात, कधी सायकलने तर कधी पायी जातात त्याच्या अशा कामगिरीने मोठं मोठ्या कारवायांना आळा बसत आहे. या अगोदर त्यांनी बळ्या दोन जुगाराव कारवाई केली होती. ती सुद्धा कारवाई वेष बदलून सायकले जाऊन केली होती. त्या कारवाई मोठ्या दिंग्जावर गुन्हे दाखल केले होते. युवक दिनी १२ गुरांना जीवनदान मिळाल्याने पशु प्रेमी पोलिसांचे कौतुक करत आहे. ही कारवाई हिवरखेड ठाणेदार व बिट जमदार यांनी केली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.