• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला! २४ तासांत १ लाख ९४ हजार नवे रुग्ण, ४४२ जणांचा मृत्यू

Our Media by Our Media
January 12, 2022
in कोविड १९, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
102 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
15
SHARES
734
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६०,४०५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ५५ हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,८६८ एवढी झाली आहे.

याआधीच्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख थोडा स्थिरावल्याचे दिसून आले होते. सोमवारी दिवसभरात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.३६ टक्के नोंदवण्यात आला होता. पण आता रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

सुरक्षा दलातील जवानांनी कोरोनाची लागण होत आहे. सध्या बीएसएफमधील ७२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सशस्त्र सीमा दलातील ५६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात ४८१ निवासी डॉक्टरांना लागण

महाराष्ट्रात आतापर्यंत ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने दिली आहे.

अमरावतीमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला!

अमरावतीत कोरोनाचा पुन्हा एक नवीन व्हेरीयंट (B.1.606) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढविणारा ओमायक्रॉन, डेल्टासह आणखी एका नवीन व्हेरियंटची भर पडली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना हा नवीन व्हेरियंट आढळून आला. कॅनडा तसेच यूएसमध्ये देखील हा व्हेरियंट आढळून आल्याची माहिती आहे. नवीन व्हेरीयंटमुळे संक्रमणात भर पडू नये म्हणून नागरिकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे.

कोरोना उपचारातून ‘मोल्नुपिरावीर’ औषध रद्द

कोरोनावरील उपचार पद्धतीत ‘मोल्नुपिरावीर’ औषधाचा समावेश करू नये, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) कोरोनाविषयक राष्ट्रीय टास्क फोर्सने काढला आहे. ‘मोल्नुपिरावीर’च्या अनुषंगाने सुरक्षाविषयक चिंता असल्याचे गेल्या आठवड्यात ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले होते. अँटिव्हायरल ड्रग ‘मोल्नुपिरावीर’चा वापर १५ ते ४५ वयोगटातील महिला कोरोनाग्रस्तांवर करण्यात येऊ नये, असा इशारा ‘नॅशनल टेक्निकल अ‍ॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’नेही मंगळवारी दिला होता.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ…

दरम्यान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत ७०,७६५ रुग्ण आढळून आले आहेत. तर १४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: coronacorona positive
Previous Post

school lockdown : शाळांचा लॉकडाऊन निर्णय तत्काळ मागे घ्या, शिक्षणतज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

हिवरखेड ठाणेदारांनी केली दबंग कारवाई, १२ गुरांना जीवनदान,

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
हिवरखेड ठाणेदारांनी केली दबंग कारवाई,१२ गुरांना जीवनदान,

हिवरखेड ठाणेदारांनी केली दबंग कारवाई, १२ गुरांना जीवनदान,

दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार;

फिरते विक्री केंद्र वितरण: दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार; दिव्यांग सर्वेक्षण सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.