अकोला दि.३१: कोविड १९ या आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलही विकसित केले आहे. जिल्ह्यात आजअखेर यासंदर्भात ४५० जणांचे अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे, जिल्हास्तरावरुन मंजूरी दिलेल्या अर्जांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय यांच्या वतीन तपासणी करुन थेट बॅंक खात्यात (डीबीटी) वारसांना अनुदान वितरीत होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
हे अनुदान मिळविण्यासाठी मृत व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांनी mahacovid19relief.in व https://epassmsdma.mahait.org/login.htm या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. ही भरलेली माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा वैद्यकीय अधिकारी यांच्या लॉगईन वर जातात. तेथे ते त्या अर्जांची छाननी करतात. तेथून ते जिल्ह्याच्या लॉगईन वर येतात. या अर्जांच्या छाननी व मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन तहसिलदार, मंडळ अधिकारी, माहिती तंत्रज्ञान सहाय्यक व कार्यालयीन कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक गठीत करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली. या पथकाने आतापर्यंत आलेल्या अर्जातून ४५० जनांचे अर्ज मंजूर केले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांना थेट बॅंक खात्यात अनुदान वितरीत करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.